महिला पोलीस कर्मचाऱ्याचे खासगी फोटो व्हायरल प्रकरणी एकाला अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील एका महिला कर्मचाराचा ई- मेल हॅक करून खासगी फोटो व्हायरल केल्याचे प्रकरण 17 जुलैला समोर आले होते.या प्रकरणी 18 जुलै रोजी पीडित महिला पोलिसाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास आला. सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील एका महिला कर्मचाराचा ई- मेल हॅक करून खासगी फोटो व्हायरल केल्‍याचे प्रकरण 17 जुलैला समोर आले होते.या प्रकरणी 18 जुलै रोजी पीडित महिला पोलिसाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्‍यावरून गुन्‍हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास आला. सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका 24 वर्षीय तरुणाला काल, 3 ऑगस्टच्‍या रात्री अटक केली.

सुनील संजय काळे (रा. बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याला आज, 4 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुनील काळे याच्या नावावर असणाऱ्या मोबाइल नंबरवरून महिला कर्मचाऱ्याचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. मात्र फोटो नेमके कुणी व्हायरल केले हे अजून समोर येऊ शकले नाही. या प्रकरणी आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. पीडितेचे अत्यंत खासगी फोटो त्यांच्या ई- मेलवर सेव्ह होते. अज्ञात व्यक्तीने हा ई- मेल आयडी हॅक करून जवळपास 30 खासगी फोटो पीडितेच्‍या मैत्रीणीला अश्लील संदेश लिहून 17 जुलै रोजी पाठवले होते.