महिला सरपंचाला मारहाण, जातिवाचक शिविगाळ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय कारणावरून महिला सरपंचाला मारहाण व जातिवाचक शिविगाळ करण्यात आल्याची घटना काल, १२ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास निपाणा (ता. मलकापूर) येथे घडली. याप्रकरणी महिला सरपंचांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच शारदा संतोष तांदूळकर या उपसरपंच प्रकाश थाटे, ग्रामपंचायत सदस्या छायाबाई …
 
महिला सरपंचाला मारहाण, जातिवाचक शिविगाळ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय कारणावरून महिला सरपंचाला मारहाण व जातिवाचक शिविगाळ करण्यात आल्याची घटना काल, १२ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास निपाणा (ता. मलकापूर) येथे घडली. याप्रकरणी महिला सरपंचांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच शारदा संतोष तांदूळकर या उपसरपंच प्रकाश थाटे, ग्रामपंचायत सदस्या छायाबाई तायडे व गावातील नालेसफाई करणारे मजूर यांच्‍यासह ग्रामपंचायत कार्यालयात हजर होत्‍या. त्यावेळी दुपारी १ च्या सुमारास गावातीलच विनोद रामा थाटे हा काठी घेऊन ग्रामपंचायतीत आला. त्याच्यासोबत त्याची पत्नी लक्ष्मी थाटेसुद्धा आली. विनोदने सरपंचांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. उपसरपंच व उपस्थित सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही काठीने मारहाण व शिविगाळ करण्यात आली. विनोद थाटे याच्या पत्नीने सरपंच महिलेसोबत केलेल्या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व नगदी १ हजार रुपये पडले.

सरपंच शारदाबाई पतीसोबत तक्रार देण्यासाठी दुचाकीने जात असताना गावातील बसस्थानकावर निितन राजपूत, गणेश राजपूत, मनिष राजपूत व इतर चार जणांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तू सरपंच कशी काय झाली, तुम्ही झेंडावंदन कसे काय करता ते आम्ही पाहतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सरपंच महिलेने दिली आहे. तक्रारीवरून विनोद रामा थाटे, लक्ष्मी रामा थाटे, नितीनसिंह राजपूत, गणेश राजपूत, गणेश राजपूत व इतर चार अशा नऊ जणांविरुद्ध मलकापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाचीही तक्रार ः घरकुलासाठी ८ अ न देता सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी मारहाण केल्याची तक्रार विनोद रामा थाटे यांनी दिली. तक्रारीवरून सरपंच, सरपंच पती, उपसरपंच यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.