महिलेची छेड काढणाऱ्या ऑटोचालकाला जमावाने धो धो धुतले; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोठी देवी मंदिराजवळ एका विवाहित महिलेची छेड काढल्यावरून ऑटोचालकाला चांडक ले आऊटजवळ अडवून जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना काल, ११ ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सय्यद आसिफ सैय्यद रफिक (रा. इकबालनगर, बुलडाणा) असे ऑटोचालकाचे नाव असून, महिलेच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनजवळील मोठी देवी मंदिराजवळ …
 
महिलेची छेड काढणाऱ्या ऑटोचालकाला जमावाने धो धो धुतले; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोठी देवी मंदिराजवळ एका विवाहित महिलेची छेड काढल्यावरून ऑटोचालकाला चांडक ले आऊटजवळ अडवून जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना काल, ११ ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

सय्यद आसिफ सैय्यद रफिक (रा. इकबालनगर, बुलडाणा) असे ऑटोचालकाचे नाव असून, महिलेच्या तक्रारीवरून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनजवळील मोठी देवी मंदिराजवळ एक विवाहित महिला व मुलगी दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा एका ऑटोचालकाने अश्लील इशारे व हावभाव केले. त्यानंतर समोर चांडक ले आऊटजवळ ऑटोला अडवून ऑटोचालक आसिफला जमावाने बेदम मारहाण केली.

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे नेते बबलू कुरेशी यांना देखील मारहाण करण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी ऑटोचालकाने सुद्धा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, बेदम मारहाण करणाऱ्या ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.