महिलेची 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी, ते देवदूत बनून धावले!; दुसरबीड येथील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन मुलांसह विहिरीत उडी घेणार्या महिलेला 2 दुचाकीस्वारांची वाचवल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे आज सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान घडली. दुसरबीड गावाजवळील पिण्याच्या पाण्याच्या सरकारी विहिरीत या महिलेने दोन चिमुकल्यांसह उडी घेतली होती. हे रस्त्यावरून जाणार्या वाकद येथील रशीद करीम कुरेशी व अनंता …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन मुलांसह विहिरीत उडी घेणार्‍या महिलेला 2 दुचाकीस्वारांची वाचवल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे आज सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान घडली.


दुसरबीड गावाजवळील पिण्याच्या पाण्याच्या सरकारी विहिरीत या महिलेने दोन चिमुकल्यांसह उडी घेतली होती. हे रस्त्यावरून जाणार्‍या वाकद येथील रशीद करीम कुरेशी व अनंता वामन चनखोरे (रा. बोरी) यांनी पाहिले. त्यांनी कोणताही विचार न करता स्वतः विहिरीमध्ये उडी घेऊन महिला व मुलांचे प्राण वाचवले. ही घटना समजताच दुसरबीडच्या उपसरपंचांनी या दोघांचा हार घालून सत्कार केला. पप्पू भुसारे, विजय राजणेे, सागर देशमुख, राम खंदारे यांनीसुद्धा महिला व मुलांना विहिरीबाहेर काढण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती कळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक दुसरबीड येथे हजर झाले.