महिलेच्या खून प्रकरणी 6 आरोपींना 14 दिवसांची न्‍यायालयीन कोठडी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या महिन्यात झालेल्या भीमनगरातील महिलेच्या खून प्रकरणात अटक आरोपींना आज, 8 मार्चला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी 5 मार्चला 6 जणांना अटक केली होती. त्यांना 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या महिन्यात झालेल्या भीमनगरातील महिलेच्या खून प्रकरणात अटक आरोपींना आज, 8 मार्चला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी 5 मार्चला 6 जणांना अटक केली होती. त्यांना 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

कुत्र्याला हाड हाड म्हटले म्हणून 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या  कांताबाई अंकुश साबळे यांचा 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान औरंगाबाद येथे  मृत्यू  झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी समाधान मोरे (45), रितेश खिल्लारे (30), आकाश कंकाळ (25) यांना अटक केली होती. 5 मार्च रोजी बबन तुकाराम जाधव (35), जयश्री बबन जाधव (31), सुनिल तुळशीराम गवई (41), संगीता तुळशीराम गवई (33), सरला शिवाजी वाघुर्डे (33), मायाबाई समाधान मोरे (41, सर्व रा. भीमनगर,बुलडाणा) यांना अटक करण्यात आली होती.