महिलेच्या खून प्रकरणी 6 जणांना अटक!; बुलडाण्यात घडली होती घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या महिन्यात भीमनगरात झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी 6 जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कुत्र्याला हाड हाड म्हटले म्हणून 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कांताबाई अंकुश साबळे यांचा 10 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान औरंगाबाद …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या महिन्यात भीमनगरात झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी 6 जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुत्र्याला हाड हाड म्हटले म्हणून 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कांताबाई अंकुश साबळे यांचा 10 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी समाधान मोरे (45) रितेश खिल्लारे (30) आकाश कंकाळ (25) या तीन जणांना 10 फेब्रुवारी रोजीच अटक केली होती, तर 6 मार्चला बबन तुकाराम जाधव(35), जयश्री बबन जाधव( 31), सुनिल तुळशीराम गवई (41), संगीता तुळशीराम गवई(33), सरला शिवाजी वाघुर्डे(33), मायाबाई समाधान मोरे (41, सर्व रा भीमनगर,बुलडाणा) यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना 8 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.