महिलेला अश्‍लील मेसेज करणारा अखेर जेरबंद; सिंदखेड राजाच्या तरुणाला अमरावतीच्या पोलिसांनी पकडून नेले

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बनावट इन्स्टाग्राम खात्यावर महिलेचे छायाचित्र लावून त्या खात्यातून महिलेला अश्लील मेसेज पाठविणार्या सिंदखेड राजा तालुक्यातील वरूडी येथील 29 वर्षीय तरुणाला अखेर अमरावती पोलिसांनी 6 जानेवारीला ताब्यात घेतले आहे. पीडिता अमरावतीची असून, तिने अमरावती पोलिसांत तक्रार दिली होती. 18 ऑक्टोबरला या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून अमरावती सायबर पोलिसांनी हनुमान …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बनावट इन्स्टाग्राम खात्यावर महिलेचे छायाचित्र लावून त्या खात्यातून महिलेला अश्‍लील मेसेज पाठविणार्‍या सिंदखेड राजा तालुक्यातील वरूडी येथील 29 वर्षीय तरुणाला अखेर अमरावती पोलिसांनी 6 जानेवारीला ताब्यात घेतले आहे. पीडिता अमरावतीची असून, तिने अमरावती पोलिसांत तक्रार दिली होती. 18 ऑक्टोबरला या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून अमरावती सायबर पोलिसांनी हनुमान सुभाष खरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हनुमानला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.