महिलेवर अत्याचार : नराधमास ७ वर्षे कारावासाची शिक्षा; संग्रामपूर तालुक्यात घडली होती घटना

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील उकळी बुद्रूक येथे घरात घुसून जबरी अत्याचार करणाऱ्या नराधमास खामगाव न्यायालयाने 7 वर्षे कारावास व 1 हजाराचा दंड ठोठावला असून, इतर कलमान्वये प्रत्येकी 1 वर्ष शिक्षा दिली आहे. सुमारे 8 वर्षांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील उकळी बुद्रुक येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. पीडितेच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील उकळी बुद्रूक येथे घरात घुसून जबरी अत्याचार करणाऱ्या नराधमास खामगाव न्यायालयाने 7 वर्षे कारावास व 1 हजाराचा दंड ठोठावला असून, इतर कलमान्वये प्रत्येकी 1 वर्ष शिक्षा दिली आहे.

सुमारे 8 वर्षांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील उकळी बुद्रुक येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. पीडितेच्‍या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनला अत्याचारासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेची पार्श्वभूमी अशी, की उकळी बुद्रूक येथील पीडित महिला घरात आपल्या लहान बाळाला दूध पाजत असताना आरोपीने घरात घुसून बळजबरीने तिच्‍यावर अत्याचार केला. मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडितेच्‍या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनला आरोपी शेख शायद शेख रशीद(23,रा. उकळी बुद्रुक, ता. संग्रामपूर ह. मु. पिंपळगाव काळे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपास अधिकारी पी. एस. आय. श्री. बडगुजर यांनी खामगाव प्रथम श्रेणी न्यायलयात सन २०१३  मध्ये चार्जशिट दाखल केली. न्यायाधीश प्रथम वर्ग यांनी आरोपी शेख शायद शेख रशीद याला कलम ३७६ मध्ये ७ वर्षे शिक्षा व १००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कैद, कलम ३२३ मध्ये १ वर्ष कैद तसेच कलम ५०६ मध्ये १ वर्ष कैद दोन्ही शिक्षा एकाच वेळेस भोगतील, असा निकाल दिला.