महिलेवर तिघांचा जीवघेणा हल्ला!; डोक्‍यात दगड घातला, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 60 वर्षीय महिलेवर एका महिलेसह दोन पुरुषांनी जीवघेणा हल्ला चढवला. डोक्यात दगड घालून काठीने मारहाण केली. ही घटना अटाळी (ता. खामगाव) येथे काल, 8 एप्रिलला दुपारी 12 च्या सुमारास घडली. सौ. उषा सदाशिव महाले (रा. अटाळी) असे महिलेचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी सौ. मंगला …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 60 वर्षीय महिलेवर एका महिलेसह दोन पुरुषांनी जीवघेणा हल्ला चढवला. डोक्‍यात दगड घालून काठीने मारहाण केली. ही घटना अटाळी (ता. खामगाव) येथे काल, 8 एप्रिलला दुपारी 12 च्‍या सुमारास घडली.

सौ. उषा सदाशिव महाले (रा. अटाळी) असे महिलेचे नाव आहे. त्‍यांच्‍या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी सौ. मंगला आत्माराम महाले, आत्माराम महाले, रवी ऊर्फ गोपाल आत्माराम महाले यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. घटनेबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की सौ. उषा महाले यांच्‍या शेतात विहीर खोदण्याचे काम चालू होते. त्यातून निघालेला मुरूम त्‍या स्वतःच्या शेताच्या धुर्‍यावर टाकत होत्‍या. काल दुपारी बाराच्या सुमारास सौ. मंगला महा्ले ही त्‍यांच्‍या शेतात आली. मुरमाने भरलेला ट्रॅक्टर अडला व माझ्या धुऱ्यावर मुरूम टाकू नको, असे म्हणून शिविगाळ करायला सुरुवात केली. उषाबाईंच्‍या डोक्यात दगड घातला. जखमी अवस्‍थेतच त्‍या घरी परतत असताना आत्माराम महाले याने मागून येत उजव्या पायाच्या मांडीवर काठी मारून अश्लील शिविगाळ केली व जखमी केले. रवी ऊर्फ गोपाल महाले याने त्‍यांना लोटून पाडले व शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास  पोहेकाँ. सुनिल राऊत करत आहेत.