माँ जिजाऊ जन्मोत्सव… गर्दीच्या शक्यतेने सिंदखेडराजात कलम 144 जारी!

सिंदखेडराजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेडराजा ऐतिहासिक नगरीत राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जगाच्या कानाकोपर्यातून माँ जिजाऊभक्त सिंदखेड राजा येथे येतात. मात्र यावर्षी जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने विविध कार्यक्रमांवर बंदी आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला कोरोनाची किनार लागू नये म्हणून या ठिकाणी दिनांक 11 व 12 …
 

सिंदखेडराजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेडराजा ऐतिहासिक नगरीत राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात  साजरा होणार आहे.

जगाच्या कानाकोपर्‍यातून माँ जिजाऊभक्त सिंदखेड राजा येथे येतात. मात्र यावर्षी जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने विविध कार्यक्रमांवर बंदी आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला कोरोनाची किनार लागू नये म्हणून या ठिकाणी दिनांक 11 व 12 जानेवारीला कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांनी एकत्र येऊ नये. अनावश्यक गर्दी टाळावी, यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.