माकडाचा प्रताप… धावत्या दुचाकीवर उडी घेतल्याने अपघात; दोघे गंभीर, मलगी फाट्यावरील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धावत्या दुचाकीवर माकडाने उडी घेतल्याने झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली.चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील भगवान मधुकर केदार (35), कल्याण अरुण पवार (28) हे दोघे मित्र चिखलीहून गावाकडे परतत होते. चिखली- देऊळगाव राजा महामार्गावर मलगी फाट्याजवळ …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धावत्या दुचाकीवर माकडाने उडी घेतल्याने झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली.
चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील भगवान मधुकर केदार (35), कल्याण अरुण पवार (28) हे दोघे मित्र चिखलीहून गावाकडे परतत होते. चिखली- देऊळगाव राजा महामार्गावर मलगी फाट्याजवळ अचानक एका माकडाने त्यांच्या दुचाकीवर उडी घेतली. यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडून दोघे पडले. दोघेही जखमी झाले. जखमींना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.