माजी आमदार डॉ. खेडेकर यांनी केली नुकसानग्रस्‍त पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघातील अवकाळी पावसासह गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी काल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची माहिती देणार असल्याचे …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघातील अवकाळी पावसासह गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी काल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.

अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची माहिती देणार असल्‍याचे त्यांनी सांगितले. डॉ. खेडेकर यांनी देऊळगाव मही परिसरातील गारखेडा, डोंडा, पिंप्री आंधाळे, खल्याळ गव्हाण, टाकरखेड भागिले या गावांत पाहणी केली. यावेळी तालुका प्रमुख दादाराव खारडे, शेतकरी लिंबाजी शिंगणे, गणेश कुटे, गजानन कुटे, संदीप राऊत यांच्‍यासह शेतकरी बांधवांची उपस्‍थिती होती.