माझ्याशी लग्‍न कर नाहीतर जीवे मारून टाकेन; 21 वर्षीय तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी, खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माझ्याशी लग्न कर नाही तर जीवे मारून टाकेन, अशी धमकी अल्पवयीन तरुणीला देऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना काल, 25 एप्रिलला दुपारी खामगाव येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेल्या तक्रारीवरून सय्यद सोहेल सय्यद गफूर (21, रा. चांदमारी, खामगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माझ्याशी लग्‍न कर नाही तर जीवे मारून टाकेन, अशी धमकी अल्पवयीन तरुणीला देऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना काल, 25 एप्रिलला दुपारी खामगाव येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेल्या तक्रारीवरून सय्यद सोहेल सय्यद गफूर (21, रा. चांदमारी, खामगाव) याच्याविरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, काल दुपारी 3 वाजता ती चांदमारी भागातून वडिलांसोबत जात होती. सोहेल तिचा पाठलाग करत होता. यावेळी तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जीवे मारून टाकेन, असे म्हणत त्याने तरुणीचा हात धरला. यावेळी मुलीच्या वडिलांनी मध्यस्थी केली असता वडिलांना सुद्धा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले  आहे. तक्रारीवरून आरोपीविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.