माटरगावमध्ये डीएपी खताची कृत्रिम टंचाई, शेतकऱ्यांत संताप

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माटरगाव (ता. शेगाव) येथे डीएपी खताची कृत्रिम टंचाई करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. गावात दहा-बारा कृषी केंद्र असूनही एकाही केंद्रावर खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत असून, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. डीएपी खताची कृषी केंद्र चालक जाणून बुजून …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माटरगाव (ता. शेगाव) येथे डीएपी खताची कृत्रिम टंचाई करण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. गावात दहा-बारा कृषी केंद्र असूनही एकाही केंद्रावर खत उपलब्‍ध होत नसल्याने शेतकरी संताप व्‍यक्‍त करत असून, कृषी विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

डीएपी खताची कृषी केंद्र चालक जाणून बुजून टंचाई निर्माण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. माटरगाव बुद्रूक या गावाला वीस ते पंचवीस खेडे लागून आहेत. शेतकरी पावसाळा लागायच्या अगोदर शेतात खते नेतात. त्यामुळे शेतकरी घाई करत आहे. एकीकडे शासन खताचा भरपूर साठा उपलब्ध आहे असे म्हणत आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना खते वेळेवर मिळत नाहीत. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना डीएपी खताचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.