माणसे उधारीत दारू पितात… विकणारे घरी येऊन महिलांकडे पैसे मागतात..!; नांदुरा तालुक्‍यातील प्रकार

दहिगाव येथील महिलांनी पोलीस, तहसीलदारांकडे मांडली फिर्याद नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहिगाव (ता. नांदुरा) येथील दारू विक्रेते माणसांना उधार दारू पाजतात. त्यानंतर उधारी घरी येऊन महिलांकडे मागत असल्याचा धक्कादायक आरोप महिलांनी नांदुरा पोलीस आणि तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. पैसे न दिल्यास दारू विक्रेत्यांकडून धमकावले जात असल्याचेही महिलांनी म्हटले आहे. दारू …
 

दहिगाव येथील महिलांनी पोलीस, तहसीलदारांकडे मांडली फिर्याद

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दहिगाव (ता. नांदुरा) येथील दारू विक्रेते माणसांना उधार दारू पाजतात. त्‍यानंतर उधारी घरी येऊन महिलांकडे मागत असल्याचा धक्‍कादायक आरोप महिलांनी नांदुरा पोलीस आणि तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.

पैसे न दिल्यास दारू विक्रेत्‍यांकडून धमकावले जात असल्याचेही महिलांनी म्‍हटले आहे. दारू पिऊन आमची माणसे घरी आल्यानंतर त्रास देतात. आमच्या घरात कायम वादविवाद चालतात. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावत असून, याला कारणीभूत असलेल्या दारू विक्रेत्‍यांविरुद्ध भूमिका घेऊन गावातील दारू बंद करावी व आमची या मरण यातनेतून सुटका करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल, असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर इंदूबाई समाधान जवरे, सविता विजय जवरे, सुभद्राबाई राजाराम जवरे, सुमनबाई भिडे व गावातील इतर महिलांच्या सह्या आहेत.