माणुसकी हरवली… लॉकडाऊनमुळे माहेरी आलेल्या बहिणीला म्‍हणाला, इथे का आलीस? तुला कोण आयते खाऊ घालणार?; चिखली तालुक्‍यातील घटना, काठीने बहिणीला मारले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या संकटात रक्ताची नातीच एकमेकांच्या मदतीला धावली. जसे शक्य होईल तशी एकमेकांना मदत केली.. पण काही ठिकाणी कोरोनाने रक्ताच्या नात्याचेही खरे रूप उघडकीस आले. लॉकडाऊनमुळे माहेरी आलेल्या बहिणीला इथे का आलीस, तुला आयते कोण खाऊ घालणार, असे बोलत भावाने काठीने मारहाण केली. ही घटना एकलारा (ता. चिखली) येथे 4 मे …
 
माणुसकी हरवली… लॉकडाऊनमुळे माहेरी आलेल्या बहिणीला म्‍हणाला, इथे का आलीस? तुला कोण आयते खाऊ घालणार?; चिखली तालुक्‍यातील घटना, काठीने बहिणीला मारले

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्‍या संकटात रक्‍ताची नातीच एकमेकांच्‍या मदतीला धावली. जसे शक्‍य होईल तशी एकमेकांना मदत केली.. पण काही ठिकाणी कोरोनाने रक्‍ताच्‍या नात्‍याचेही खरे रूप उघडकीस आले. लॉकडाऊनमुळे माहेरी आलेल्या बहिणीला इथे का आलीस, तुला आयते कोण खाऊ घालणार, असे बोलत भावाने काठीने मारहाण केली. ही घटना एकलारा (ता. चिखली) येथे 4 मे रोजी रात्री 8 च्‍या सुमारास घडली. तिने काल, 5 मे रोजी चिखली पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिल्याने भावाविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे.

सौ. अनिता ज्ञानेश्वर काळे (26, रा. मोहाडी, ह.मु. एकलारा ता. चिखली)  हिने तक्रार दिली, की ती पती ज्ञानेश्वर काळे व दोन मुलांसोबत पुण्यात राहते. सध्या लॉकडाऊन लागल्याने ती दोन मुलांसोबत माहेरी एकलारा येथे आई जनाबाई मदन झगरे व भाऊ समाधान मदन झगरे यांच्‍याकडे 30 मार्चला आली होती. 4 मेच्‍या रात्री 8 वाजता भाऊ समाधान दारू पिऊन घरी आला. तिला म्हणाला, की तू येथे का आलीस. तू तुझ्या घरी निघून जा. तुला येथे आयते कोण खाऊ घालणार, तुला माझ्या हिश्श्याचे काही एक भेटणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करून तुला ठोकून काढीन, असे सांगून मारण्याची धमकी दिली. अनिताने त्‍याला हे माझ्या पण वडिलांचे घर आहे, असे म्हटल्यावर त्याने तिला लाथा व बुक्‍क्यांनी मारहाण केली. बांबूच्‍या काठीने तिच्‍या उजव्या व डाव्या पायाच्‍या मांडीवर तसेच पाठीवर मारहाण केली. त्यामुळे तेथे रक्त गोठले. उजव्या पायाचे पंजाला सूज आली. आई गं.भा जनाबाई मदन झगरे व चुलतभाऊ राजू रामराव झगरे, संतोष रामकृष्ण झगरे यांनी समाधानला आवरले. अनिताने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी समाधानविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.