माणुसकी हरवू नका..! वडील कोरोनाने गेल्यानंतर गावात अंत्यसंस्‍काराला विरोध केलाच, पण आता शेतात मुगाच्‍या मळणीसाठीही कुणी येईना!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे रक्ताची नातीसुद्धा दूर गेल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. काही ठिकाणी तर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबालाच वाळीत टाकण्याचेही प्रकार समोर आले. असाच एक प्रकार सातगाव म्हसला (ता. बुलडाणा) येथे समोर आला आहे. सातगाव म्हसला येथील 65 वर्षीय व्यक्तीचा 16 मे रोजी चिखली येथे एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला होता. काही लोकांच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे रक्ताची नातीसुद्धा दूर गेल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. काही ठिकाणी तर कोरोनाग्रस्त रुग्णांच्‍या कुटुंबालाच वाळीत टाकण्याचेही प्रकार समोर आले. असाच एक प्रकार सातगाव म्हसला (ता. बुलडाणा) येथे समोर आला आहे.

सातगाव म्हसला येथील 65 वर्षीय व्यक्तीचा 16 मे रोजी चिखली येथे एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला होता. काही लोकांच्या विरोधामुळे त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार न करता काही सामाजिक कार्यकर्ते व नगरपालिका प्रशासनाने चिखली येथेच अंत्यसंस्कार केले. हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ होता. अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या मुलाने स्वतःहून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंबासह सर्वांची टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आली.

मात्र यादरम्यान काही लोकांनी सावत्रपणाची वागणूक दिल्याची खंत मुलाने बुलडाणा लाइव्हकडे व्यक्त केली. हॉस्पिटलचे बिलाचे पैसे देण्यासाठी शेतातील उन्हाळी मुगाची मळणी करणे आवश्यक होते. मात्र गावात अफवा पसरून अख्खे घरच पॉझिटिव्ह असल्याची चर्चा होती. त्यामुळे मळणी करण्यासाठी मशीन आणि मजूरसुद्धा उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.