माथेफिरू ज्ञानेश वाकुडकरला कडक पायबंद घाला; जिल्ह्यात भाजप पदाधिकारी संतापले; पोलीस ठाण्यांत तक्रारी

बुलडाणा (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून) ः भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्या तथाकथित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर याच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करत 17 जानेवारीला भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात निवेदने दिली. जळगाव जामोदमध्ये आ. कुटेंच्या नेतृत्त्वात निवेदन जळगाव जामोद (गणेश भड) ः येथे पोलीस ठाण्याला निवेदन देताना …
 

बुलडाणा (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून) ः भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या तथाकथित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर याच्याविरुद्ध  तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी    करत 17 जानेवारीला भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात निवेदने दिली.

जळगाव जामोदमध्ये आ. कुटेंच्या नेतृत्त्वात निवेदन

जळगाव जामोद (गणेश भड) ः येथे पोलीस ठाण्याला निवेदन देताना माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे, तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, सचिन देशमुख, राजेंद्र गांधी, रामेश्‍वर राऊत, पंचायत समिती सभापती महादेवराव धुर्डे, नीलेश शर्मा, राम इंगळे, अशोक काळपांडे, गुणवंत कपले, प्रतिक खिरोडकार, शरद खवणे, मोहित सरप, रमेश कोथळकार, अंबादास निंबाळकर, जयकुमार पारस्कर, शैलेंद्र बोराडे, मंगेश बावस्कर, कैलास डोबे, राम शिंदिकर, पुरुषोत्तम खत्ती, सुधीर ठाकरे, अरुण खिरोडकार, सुरेश इंगळे, संजय देशमुख यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेगावमध्ये निवेदन

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या आदेशाने शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतडक यांच्या नेतृत्वात शेगाव शहरचे ठाणेदार श्री. टाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमित जाधव, माजी नगरसेवक विजय यादव, प्रमोद काठोळे, मुकुंदा खेडकर, संतोष सानप, प्रशांत चांदूरकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मेहकरमध्ये निवेदन

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः मेहकर येथील पोलीस ठाण्यात आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीताराम महाराज ठोकळ, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या नेतृत्वात तक्रार दाखल करण्यात आली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींबद्दल चुकीचे लिखाण केले असून, यामुळे देशवासिय आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी मेहकर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.