मामासह दोन भाचांचा बुडून मृत्‍यू; पोहोयला धरणात उतरले, आज मृतदेह तरंगले!!

जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मामासह दोन भाचे धरणात पोहोण्यासाठी धरणात उतरले. मात्र बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, 18 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध शिवारात समोर आली आहे. धानोरा लघु प्रकल्पात त्यांचे मृतदेह आज सकाळी तरंगले होते. यामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र …
 

जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मामासह दोन भाचे धरणात पोहोण्यासाठी धरणात उतरले. मात्र बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, 18 मे रोजी सकाळी 7 च्‍या सुमारास जळगाव जामोद तालुक्‍यातील धानोरा महासिद्ध शिवारात समोर आली आहे.

धानोरा लघु प्रकल्पात त्‍यांचे मृतदेह आज सकाळी तरंगले होते. यामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावावर शोककळा पसरली आहे. पुणे येथे नोकरी करणारा विनायक गाडगे (27) सध्या लॉकडाऊनमुळे गावी धानोरा येथे आला होता. त्याच्‍या काकाचा मुलगा तेजस गाडगे (18) व लग्‍न समारंभासाठी (दाताळा ता. मलकापूर) येथून बहिणीला घ्यायला धानोरा येथे आलेले त्याचे मामा नामदेव वानखडे ( 43) हे काल, 17 मे रोजी दुपारी 3:30 च्या दरम्यान धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. उन्हाळा असल्याने पाण्यात पोहोण्यासाठी उतरले.  रात्री उशिरापर्यंत तिघेही घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केली.

घटनेची माहिती गावच्‍या पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्याला दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाइल काठावर आढळले. मात्र रात्र झाल्याने अंधारात तिघांचा शोध लागला नाही. आज, 18 मे रोजी सकाळी मृतदेह तरंगून आले. पाण्यात पोहणाऱ्यांच्‍या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन वाकडे, एएसआय लक्ष्‍मण गव्हाळे करीत आहेत.