मायक्रोफायनान्सवाले महिलेच्‍या घरात घुसले!; शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी, साखळी बुद्रूक येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फायनान्स कंपन्यांची “हप्तेवसुली’साठी मुजोरी वाढली आहे. अपमानित करण्यापासून ते धाक दाखविण्यापर्यंतचे हातखंडे, वेळप्रसंगी धक्काबुक्की करण्यालाही अनेक “वसुलीखोर’ मागेपुढे पाहत नाहीत. असाच प्रकार साखळी बुद्रूक (ता. बुलडाणा) येथे आज, २३ जूनला समोर आला. महिलेच्या घरात घुसून दोन साथीदारांसह आलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याने शिविगाळ करत तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना …
 
मायक्रोफायनान्सवाले महिलेच्‍या घरात घुसले!; शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी, साखळी बुद्रूक येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फायनान्स कंपन्यांची “हप्‍तेवसुली’साठी मुजोरी वाढली आहे. अपमानित करण्यापासून ते धाक दाखविण्यापर्यंतचे हातखंडे, वेळप्रसंगी धक्‍काबुक्‍की करण्यालाही अनेक “वसुलीखोर’ मागेपुढे पाहत नाहीत. असाच प्रकार साखळी बुद्रूक (ता. बुलडाणा) येथे आज, २३ जूनला समोर आला. महिलेच्या घरात घुसून दोन साथीदारांसह आलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याने शिविगाळ करत तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. महिलेने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

साखळी बुद्रूक येथील छाया गणेश मोरे (४५) मजुरी करतात. त्‍यांच्‍या पतीचे निधन झालेले आहे. त्‍यांचा मुलगा नितीनने दोन वर्षांपूर्वी बेरार फायनान्सकडून हिरो कंपनीची फॅशन प्रो गाडी घेतली होती. लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने त्यांचे काही महिन्यांचे हप्‍ते थकले होते. आज दुपारी सुनील मोरे हा फायनान्स कंपनीचा कर्मचारी दोन जण सोबत घेऊन मोरे यांच्‍या घरी आला. त्यावेळी नितीन खामगावला गेल्याने त्‍या एकट्याच घरी होत्या. कर्मचाऱ्याने तुमचा मुलगा कुठे आहे असे विचारले असता तो खामगावला गेल्याचे छाया मोरे यांनी सांगितले. यावेळी तुमचा मुलगा गावातच आहे. तुम्ही खोटे बोलत आहात, असे कर्मचारी म्‍हणू लागला. छाया मोरे यांच्याकडून त्यांच्या मुलाचा नंबर घेऊन त्याला फोन लावला. सुनील मोरे याने नितीन मोरेला फोनवर शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.