मायलेकीवर चौघांनी हल्ला चढवला!; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मायलेकीवर लाठीहल्ला चढवून जखमी केल्याची घटना आज, 15 मार्चला गायगाव खुर्द (ता. शेगाव) येथे काल, 14 मार्चच्या सकाळी घडली. या प्रकरणी कामिनाबाई गुनाजी सोनोने (60) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी लकी सिधा सोनोने, गौतम सोनोने, गणेश सोनोने, सिधा सोनोने (सर्व रा. गायगाव खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ःबुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मायलेकीवर लाठीहल्ला चढवून जखमी केल्याची घटना आज, 15 मार्चला गायगाव खुर्द (ता. शेगाव) येथे काल, 14 मार्चच्‍या सकाळी घडली.

या प्रकरणी कामिनाबाई गुनाजी सोनोने (60) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी लकी सिधा सोनोने, गौतम सोनोने, गणेश सोनोने, सिधा सोनोने (सर्व रा. गायगाव खुर्द) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍या सकाळी अंगण झाडत असताना लकी याने अंगातला गोटा उचलला. त्‍याला कामिनाबाईंनी गोटा उचलू नको असे म्‍हटले. तेव्‍हा त्‍याने तो गोटा मारण्यासाठी धावला. काठी आणून शिविगाळ करत त्‍यांच्‍या डाव्या खांद्याला काठी मारली. कामिनाबाईंची मुलगी भांडण आवरण्यासाठी आली असता तिला उजव्‍या हातावर, पोटीवर काठीने मारले. गौतम, गणेश, सिधी यांनी त्‍याला साथ देत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तपास पोहेकाँ ज्ञानदेव ठाकरे करत आहेत.