मायेची ऊब… 16 व्या वाढदिवशी कोमलने 16 जणांना केले ब्लँकेट वाटप!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढदिवस हा प्रत्येकासाठी अत्यानंदाचा दिवस असतो. हा क्षण अविस्मरणीय करण्याकडे अनेकांना कल असतो. चिखलीच्या आदर्श शाळेत 10 वीत शिकणार्या कोमल लढ्ढा आपला 16 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही अविस्मरणीय केला. कोमलने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत 14 जानेवारीला रस्त्याकडेला झोपणार्या निराधारांना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढदिवस हा प्रत्येकासाठी अत्यानंदाचा दिवस असतो. हा क्षण अविस्मरणीय करण्याकडे अनेकांना कल असतो. चिखलीच्या आदर्श शाळेत 10 वीत शिकणार्‍या कोमल लढ्ढा आपला 16 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही अविस्मरणीय केला.

कोमलने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत 14 जानेवारीला रस्त्याकडेला झोपणार्‍या निराधारांना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना मायेची ऊब दिली. कोमल व निर्मल लढ्ढा या भावंडांनी कोमलचा वाढदिवस अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेत जमविलेल्या पैशातून विविध ठिकाणी उघड्यावर झोपणार्‍या निराधारांना ब्लँकेट वाटपाचे नियोजन आधीच केले होते. त्यानुसार त्यांनी 16 जणांना ब्लँकेटचे वाटप करून 16 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.