मार्केटमध्ये काही तासांची दिवाळी! ‘लॉकडाऊन’आधी कोरोनाचे टच मी टच मी…!

बुलडाणा/खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहा दिवसांचा लॉकडाऊन लागण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी बाकी आहे. त्यातच प्रशासनाने दुपारी 4 पर्यंत किराणा, भाजीपाला खरेदीसाठी दुपारी 4 पर्यंत मुभा दिली आहे. दहा दिवसांच्या या ‘अत्यावश्यक’ खरेदीसाठी सध्या जिल्ह्यातील सर्व शहरे आणि मोठ्या गावांतील बाजारपेठेत जणू काही तासांची दिवाळी साजरी होतेय. प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र आहे. यातून कोरोना …
 

बुलडाणा/खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दहा दिवसांचा लॉकडाऊन लागण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी बाकी आहे. त्‍यातच प्रशासनाने दुपारी 4 पर्यंत किराणा, भाजीपाला खरेदीसाठी दुपारी 4 पर्यंत मुभा दिली आहे. दहा दिवसांच्‍या या ‘अत्‍यावश्यक’ खरेदीसाठी सध्या जिल्ह्यातील सर्व शहरे आणि मोठ्या गावांतील बाजारपेठेत जणू काही तासांची दिवाळी साजरी होतेय. प्रचंड गर्दी उसळल्‍याचे चित्र आहे. यातून कोरोना ‘टच मी टच मी…’ करत पसरत असेल तर पुढील काही दिवसांत कळेलच. सुरक्षित अंतर नावालाही नाही. जोतो दहा दिवसांची काळजी करतोय, पण या काळजीपोटी जीवघेणे संकट अंगावर घेतोय, हेही त्‍याच्‍या लक्षात येत नाही. कोरोनाविषयक नियम या गर्दीने धाब्‍यावर बसवल्याचे गंभीर चित्र जिल्हाभरात दिसून आले.

पहाटेपासून भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली. सकाळी 11 पर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याने ही गर्दी होणे साहाजिक होते. अनेक जणांची गर्दीमुळे गैरसोय होऊन खरेदी अशक्‍य होणार असल्याने प्रशासनाने वेळ वाढवून देत दुपारी 4 पर्यंतची मुभा दिली. याचा परिणाम उलटाच झाल्‍याचे बाजारपेठेत दिसून आले. लॉकडाऊनमध्ये वाहने रस्‍त्‍यावर फिरणार नसली तरी पेट्रोल भरण्यासाठी मात्र रांगा लागल्या. बाजारपेठेत हव्‍या त्‍या खरेदी प्रचंड गर्दी उसळली. आठवडे बाजारातही होत नाही एवढी गर्दी झाल्‍याचे पहायला मिळाले. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांत हे चित्र होते. होम डिलेव्‍हरीचा पर्याय असूनही नागरिकांनी केलेली ही गर्दी उद्या त्‍यांनाच भोवली तर नवल नसणार एवढे नक्‍की. विशेष म्‍हणजे अनेकांच्‍या तोंडाला मास्‍कही नव्‍हता.

दोन्ही छायाचित्रे शेगाव येथील बाजारपेठेतील. (छायाचित्रे ः ज्ञानेश्वर ताकोते)