मालवाहू वाहनाने उडवले; शेतकरी जागीच ठार, बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मालवाहू वाहनाने उडवल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बुलडाणा – धाड रोडवरील कोलवडजवळील श्याम हॉटेलसमोर घडली. विलास शेषराव पाटील (६२, रा. कोलवड, ता. बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विलास पाटील आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दूध काढण्यासाठी शेतात जात होते. …
 
मालवाहू वाहनाने उडवले; शेतकरी जागीच ठार, बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मालवाहू वाहनाने उडवल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बुलडाणा – धाड रोडवरील कोलवडजवळील श्याम हॉटेलसमोर घडली.

विलास शेषराव पाटील (६२, रा. कोलवड, ता. बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विलास पाटील आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दूध काढण्यासाठी शेतात जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या मालवाहू छोटा हत्ती वाहनाने (क्र. एमएच २७ बीएक्स ४६८१) त्यांना जबर धडक दिली. यात ते जागेवरच कोसळल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. धडक देणारे वाहन घटनास्थळवरून पसार झाले. मात्र पोलिसांनी नाकेबंदी करून धाड नाक्यावरील कृषी उत्पन्‍न बाजार समितीजवळ वाहनाला पकडले. वाहनचालक अक्षय ज्ञानेश्वर लांडगे (रा .मूर्तीजापूर, अकोला) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.