माहेरहून ५० हजार आण म्‍हणून ५५ वर्षांच्‍या आजीबाईचा छळ!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरहून पैसे आणण्यासाठी छळाच्या घटना तशा नवीन नाहीत. छळ होणाऱ्या विवाहिता १८ ते ४०-४५ वयाेगटातील असतात. पण खामगाव तालुक्यात जरा वेगळीच घटना समोर आली आहे. ५५ वर्षीय वृद्धेचा माहेरवरून ५० हजार रुपये आण म्हणून छळ सुरू अाहे. अखेर वृद्धेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिच्या …
 
माहेरहून ५० हजार आण म्‍हणून ५५ वर्षांच्‍या आजीबाईचा छळ!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरहून पैसे आणण्यासाठी छळाच्‍या घटना तशा नवीन नाहीत. छळ होणाऱ्या विवाहिता १८ ते ४०-४५ वयाेगटातील असतात. पण खामगाव तालुक्‍यात जरा वेगळीच घटना समोर आली आहे. ५५ वर्षीय वृद्धेचा माहेरवरून ५० हजार रुपये आण म्‍हणून छळ सुरू अाहे. अखेर वृद्धेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तिच्‍या वृद्ध पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. विशेष म्‍हणजे तिचा पती कुणी साधासुधा नाही. त्‍याच्‍याविरुद्ध चार वर्षांपूर्वी एक खुनाचा गुन्‍हा दाखल आहे. सध्या तो जामिनावर आलाय आणि म्‍हातारीचा छळ मांडला आहे.

सौ. सरस्वताबाई पांडुरंग सावरकर (रा. माक्ता ता. खामगाव) असे तक्रारकर्त्या आजीचे नाव आहे. त्‍यांना तीन मुले व एक मुलगी आहे. तक्रारीत आजीबाईने म्‍हटले आहे, की त्‍यांचे पती पांडुरंग उखर्डा सावरकर याला दारूचे व्यसन असल्याने तो काहीही कामधंदा करत नाही. सतत दारू पिऊन लहानसहान कारणाने भांडतो. घरखर्चासाठी तसेच दारू पिण्यासाठी माहेरवरून ५० हजार रुपये आण असा तगादा लावताे. पैसे आणले नाही म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देताे. २ सप्‍टेंबरला दुपारी ४ वाजता त्‍या घरी असताना पांडुरंग खामगाव येथून दारू पिऊन आला. “मी माझ्या पैशाने बाजार केला. सामान आणले. आता तू तुझ्या माहेरहून घरखर्चासाठी व मला दारू पिण्यासाठी पैसे आण’, असे म्‍हणाला. तेवढ्यावर न थांबता त्‍याने लाकडी दांड्याने पाठीवर, डोक्यावर, हातावर व पायावर मारहाण केली. त्यात आजीबाईचे डोके फुटले.