माहेरहून 3 लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ; बुलडाण्यात सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरहून 3 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात सासरच्या 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ माहेर असलेली रजियाबी कमरुजमा शेख (35, रा. जोहरनगर बुलडाणा) यांचा विवाह बुलडाण्यातील जोहरनगरातील कमरु शेखसोबत (50) 2017 मध्ये झाला होता. कमरूचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माहेरहून 3 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात सासरच्‍या 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ माहेर असलेली रजियाबी कमरुजमा शेख (35, रा. जोहरनगर बुलडाणा) यांचा विवाह बुलडाण्यातील जोहरनगरातील कमरु शेखसोबत (50) 2017 मध्ये झाला होता. कमरूचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर राजियाबीचा छळ सुरू झाला. माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन येण्यासाठी वारंवार दबाव आणि मारहाण करण्यात येत होती. अखेर या 14 ऑगस्ट 2020 रोजी रजियाबीला पती व नातेवाइकांनी 3 लाख रुपये आणण्यासाठी घरातून हाकलून लावले. त्यामुळे ती माहेरी भुसावळला निघून गेली होती. काल 3 मार्च रोजी याप्रकरणी तिने शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा रजियाबीचा पती कमरू व त्याच्या घरातील 8 सदस्य (रा. जोहरनगर,बुलडाणा) अशा 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोहेकाँ श्री. लोखंडे करत आहेत.