मित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्‍कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही धक्कादायक घटना चिखली शहरातील डीपी रोड भागात काल, २३ जुलैला दुपारी घडली. याप्रकरणी बलात्कार करणारा व त्याला सहकार्य करणारा त्याचा मित्र अशा दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश लक्ष्मण रहाटे (२४) व योगेश शंकर महाकाळ (२५, दोघेही रा. पिंपळगाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही धक्कादायक घटना चिखली शहरातील डीपी रोड भागात काल, २३ जुलैला दुपारी घडली. याप्रकरणी बलात्कार करणारा व त्‍याला सहकार्य करणारा त्‍याचा मित्र अशा दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश लक्ष्मण रहाटे (२४) व योगेश शंकर महाकाळ (२५, दोघेही रा. पिंपळगाव उंडा ता. मेहकर) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काल सकाळी ११ च्या सुमारास उमेशने पीडित मुलीला फोन केला व चिखलीला येण्याबद्दल सांगितले. तिला मोटारसायकलवर बसवून चिखलीला आणले. चिखलीत डीपी रोडवर रूम करून राहणारा त्याचा मित्र योगेश शंकर महाकाळ याच्या रूमवर नेले. तिथे योगेशने रूमचा बाहेरून दरवाजा लावला. रूममध्ये उमेश व अल्पवयीन मुलगी दोघेच होते. ही संधी साधून त्‍याने तिच्‍यावर बलात्कार केला. त्‍यानंतर तिला डीपी रोडवरच सोडून दिले. भेदरलेल्या पीडितेने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेतली. काल रात्री उशिरा याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिखली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.