मित्राच्‍या घरी झोपला होता… मित्र समजून हल्लेखोरांनी त्‍यालाच झोडपले!; उंद्री येथील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मित्राच्या घरी टीव्ही पाहत असताना लाईट गेली. त्यामुळे त्याने तिथेच पलंगावर अंग टाकले. त्याचवेळी मित्राला मारायला आलेल्या दोघांनी अंधारात त्यालाच बदडले. ही घटना उंद्री (ता. चिखली) येथे ४ जुलैला रात्री आठच्या सुमारास घडली. कैलास रमेश बारगळ (२९, उंद्री) याच्या शेजारी राजेश विजय शिरसाठ राहतो. त्याने केबल चोरी प्रकरणात साक्ष दिलेली …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मित्राच्‍या घरी टीव्‍ही पाहत असताना लाईट गेली. त्‍यामुळे त्‍याने तिथेच पलंगावर अंग टाकले. त्‍याचवेळी मित्राला मारायला आलेल्या दोघांनी अंधारात त्‍यालाच बदडले. ही घटना उंद्री (ता. चिखली) येथे ४ जुलैला रात्री आठच्‍या सुमारास घडली.

कैलास रमेश बारगळ (२९, उंद्री) याच्‍या शेजारी राजेश विजय शिरसाठ राहतो. त्याने केबल चोरी प्रकरणात साक्ष दिलेली आहे. साक्ष दिल्याचा वचपा काढण्यासाठी दोघांनी त्‍याच्‍यावर हल्ल्याचा कट आखला होता. मात्र राजेशच्‍या ऐवजी कैलासनेच मार खाल्ला. रात्री आठला कैलास हा राजेशच्‍या घरी टीव्ही पाहत होता. त्‍याचवेळी वीज गेली. अंधार झाल्‍याने त्‍याने तिथेच पलंगावर अंग टाकले. थोड्याच वेळात अंधारातच तेथे शेख नाजीम शेख हुसेन व नरेश ज्ञानेश्वर खंडारे आले. त्‍यांनी राजेश समजून कैलासलाच लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज एेकून कैलासचे वडील धावत आले. त्‍यांनी कैलासला वाचवले. त्‍यामुळे शेख नाजीम आणि नरेश खंडारे तिथून पळून गेले. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.