मिलिंद सोमणची पत्नी म्हणते, लहानपणी माझ्यावर कित्येकदा…

मुंबई : अभिनेता मिलिंद सोमण सुपर मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. ५५ वर्षांचे वय असतानासुद्धा तरुणांना लाजवेल अशी त्याची शरीरयष्टी आहे. स्वतःपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारसोबत तो विवाहबंधनात अडकला आहे. अंकिताने तिच्या खासगी आयुष्याबाबतच्या गोष्टी शेअर करणारा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. त्यात तिने तिला लहानपणी आलेले अनुभव सांगितले आहेत. लहान असताना मी …
 
मिलिंद सोमणची पत्नी म्हणते, लहानपणी माझ्यावर कित्येकदा…

मुंबई : अभिनेता मिलिंद सोमण सुपर मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. ५५ वर्षांचे वय असतानासुद्धा तरुणांना लाजवेल अशी त्याची शरीरयष्टी आहे. स्वतःपेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारसोबत तो विवाहबंधनात अडकला आहे. अंकिताने तिच्या खासगी आयुष्याबाबतच्या गोष्टी शेअर करणारा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. त्यात तिने तिला लहानपणी आलेले अनुभव सांगितले आहेत. लहान असताना मी हुशार होते. आयुष्य संघर्षदायी होते. लहानपणी माझा अनेकदा छळ झाला होता, असे अंकिताने व्हिडिओत सांगितले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. ती म्हणते, लहानपणी माझ्यावर खूप अत्याचार झाले आहेत. ती एका होस्टेलमध्ये लहानाची मोठी झाली. ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांनी माझा विश्वासघात केला, असेही ती सांगते. वडील,भाऊ आणि आधीचा प्रियकर गमावल्याचे तिने सांगितले. यावर तिचा नवरा मिलिंद तिला दिलासा देत तू या सर्व गोष्टीतून समोर आली आहे, असे म्हणाला.