मिशन ग्रामपंचायत निवडणूक ः सिंदखेड राजात मतदान अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

सिंदखेडराजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीला होऊ घातलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानाचे आज, 2 जानेवारीला मतदान अधिकारी 1 व 2 व केंद्राध्यक्ष यांना प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीसाठी 787 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता प्रशिक्षणास सुरुवात झाली. एस. डी. ओ. सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार …
 

सिंदखेडराजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीला होऊ घातलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानाचे आज, 2 जानेवारीला मतदान अधिकारी 1 व 2 व केंद्राध्यक्ष यांना प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीसाठी 787 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता प्रशिक्षणास सुरुवात झाली. एस. डी. ओ. सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार प्रविण लटके, एस.डी.बंगाळे आदींची उपस्थिती होती. प्रशिक्षणात मतदान नमुने भरणे, इव्हीएम हाताळणी, सीएसआर, मॉक पोल,सिंलीग साहित्य वाटप व तपासणी, मतदान प्रशिक्षण यावर मार्गदर्शन करण्यात आले.