मी ग्रामपंचायत सदस्य, गावात देशी दारूचा धंदा करायचा तर महिन्याला 10 हजार दे…; घिर्णीत गुन्‍हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुला गावात देशी दारूचा व्यवसाय करायचा असेल तर मला महिन्याचे दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून देशी दारू दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी घिर्णी (ता. मलकापूर) येथील आतिष राजपूतविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28 जूनला रात्री आठच्या सुमारास घिर्णी येथे …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुला गावात देशी दारूचा व्यवसाय करायचा असेल तर मला महिन्‍याचे दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे म्‍हणून देशी दारू दुकानदाराला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्या प्रकरणी घिर्णी (ता. मलकापूर) येथील आतिष राजपूतविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना 28 जूनला रात्री आठच्‍या सुमारास घिर्णी येथे घडली.

सागर रामेश्वर बाजोडे (29, रा. घिर्णी) याने तक्रार दिली की तो त्याच्‍या देशी दारूच्या दुकानासमोर उभा असताना आतिष राजपूत तेथे आला. मी गावातील ग्रामपंचायत सदस्य आहे. तुला गावात देशी दारूचा व्यवसाय करायचा असेल तर मला महिन्‍याचे दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे म्‍हणून त्‍याने सागरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गच्ची धरून लोटपाट केली. त्‍याच्‍या खिशातील पैसे बळजबरीने काढून घेतले व जिवाने मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. तायडे करत आहेत.