मी नेहमीच्या त्रासाला कंटाळली… म्हणत फोन ठेवला अन्‌ गळ्याला लावला फास; खामगाव येथील विवाहितेच्या आत्‍महत्‍येप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १० ऑगस्टला खामगाव शहरातील शिवाजीनगरात घडली होती. सासू, नणंद आणि नंदोईने मारहाण व छळ केल्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार विवाहितेच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून ३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीना नरेंद्र काळे …
 
मी नेहमीच्या त्रासाला कंटाळली… म्हणत फोन ठेवला अन्‌ गळ्याला लावला फास; खामगाव येथील विवाहितेच्या आत्‍महत्‍येप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३५ वर्षीय विवाहितेने आत्‍महत्‍या केल्याची घटना १० ऑगस्‍टला खामगाव शहरातील शिवाजीनगरात घडली होती. सासू, नणंद आणि नंदोईने मारहाण व छळ केल्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार विवाहितेच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्‍यावरून ३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रीना नरेंद्र काळे असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची आई मीरा मुकुंदराव अनोसे (५८, रा. दर्यापूर, बारडोलपुरा गुजरात) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या चार मुलींपैकी दोन मुली रीना व टीना या दोघींना एकाच घरात नरेंद्र काळे व अविनाश काळे यांच्याकडे शिवाजीनगर खामगाव येथे दिले आहे. दोन्ही मुलींचा सासू शांताबाई लक्ष्मण काळे(६०), नणंद शारदा सुरेश लोखंडे((३८) व नंदोई सुरेश अश्रू लोखंडे(४०, तिघेही रा. डाबकी रोड अकोला) छळ करत होते.

लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिविगाळ करत होते. तुम्ही राहत असलेले घर खाली करा अन्यथा जीवे मारून टाकू, अशा धमक्याही दोन्ही मुलींना मिळत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १० ऑगस्ट रोजी सासू, नणंद व नंदई हे खामगावला आले. रीनाला पुन्हा लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. त्यामुळे सकाळी ८ वाजता रीनाने तिच्या आईला फोन केला व घडलेली हकीकत सांगितली. मी या नेहमीच्या त्रासाला कंटाळली आहे. आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर दोन तासांनी रीनाने घरातील पंख्याला गळफास घेतला. मुलीच्या आत्महत्येस सासू, नणंद व नंदोई हेच कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.