मुंबईला घर घेण्यासाठी विवाहितेचा छळ मांडला; 6 जणांविरुद्ध बुलडाण्यात गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मुंबईला घर घेण्यासाठी तुझ्या माहेरवरून पैसे आण. नाहीतर फारकती दे, अशी मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका धम्मपाल अहिरे (24, रा. वाॅर्ड नं. 1, बुलडाणा) हिचे लग्न 3 वर्षांपूर्वी किंन्होळा (ता. बुलडाणा) येथील धम्मपाल नंदू अहिरे याच्यासोबत झाले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः मुंबईला घर घेण्यासाठी तुझ्या माहेरवरून पैसे आण. नाहीतर फारकती दे, अशी मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोनिका धम्मपाल अहिरे (24, रा. वाॅर्ड नं. 1, बुलडाणा) हिचे लग्‍न 3 वर्षांपूर्वी किंन्होळा (ता. बुलडाणा) येथील धम्मपाल नंदू अहिरे याच्यासोबत झाले होते. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर मोनिकाला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाला. मुंबईला घर घेण्यासाठी माहेरवरून पैसे आण नाहीतर फारकती दे, अशी धमकी पती देऊ लागला. त्‍यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. छळाला कंटाळून मोनिका काही दिवसांपूर्वी बुलडाणा येथे माहेरी आली होती. काल या प्रकरणी मोनिकाने बुलडाणा शहर पोलिसांत धाव घेतली. रात्री उशिरा या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धम्मपाल नंदू अहिरे (पती), नंदू पुंडलिक अहिरे (सासरा), सुमित्रा नंदू अहिरे (सासू), सचिन नंदू अहिरे (दीर, चौघेही रा. किंन्होळा, ता. मोताळा) व शालू सचिन माळी, सचिन माळी (दोघे रा. मलकापूर) अशी आरोपींची नावे आहेत.