मुकुल वासनिकांची चिखलीत केंद्र सरकारवर टीका; सरकार वस्‍तुस्‍थिती लपवत असल्याची टीका, राजीव गांधी प्राणवायु प्रकल्पाचे लोकार्पण

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी चिखलीतील अनुराधानगरी परिसरात उभारलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे स्वातंत्र्य दिनी लोकार्पण करताना केंद्र सरकारवर टीका केली. ऑक्सिजनमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा सपशेल खोटा असून, सरकार वस्तुस्थिती लोकांपासून लपवत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी कार्यात सदैव तत्पर राहावे, …
 
मुकुल वासनिकांची चिखलीत केंद्र सरकारवर टीका; सरकार वस्‍तुस्‍थिती लपवत असल्याची टीका, राजीव गांधी प्राणवायु प्रकल्पाचे लोकार्पण

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी चिखलीतील अनुराधानगरी परिसरात उभारलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे स्वातंत्र्य दिनी लोकार्पण करताना केंद्र सरकारवर टीका केली. ऑक्सिजनमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा सपशेल खोटा असून, सरकार वस्तुस्थिती लोकांपासून लपवत असल्याचे ते म्‍हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी कार्यात सदैव तत्पर राहावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

या प्रकल्पासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. यावेळी प्राणवायू प्रकल्प उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचा सत्‍कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हा काँग्रेसचे माजीध्यक्ष श्याम उमाळकर, आमदार राजेश एकडे, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, विजय अंभोरे, मेहकरचे नगराध्यक्ष कासिम गवळी, जि.प.महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड. वृषाली बोंद्रे, दीपक देशमाने, अ.रफीक कादर, शहजाद अली, डॉ.इसरार, मनोज कायंदे, समाधान सुपेकर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडतकर आदींची उपस्‍थिती होती.