मुख्यमंत्री ठाकरेंच्‍या आशीर्वादानेच आ. भास्‍कर जाधव “उद्दाम’; आमदार श्वेताताई महाले यांचा घणाघात

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः: संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी आणि जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. …
 
मुख्यमंत्री ठाकरेंच्‍या आशीर्वादानेच आ. भास्‍कर जाधव “उद्दाम’; आमदार श्वेताताई महाले यांचा घणाघात

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः: संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी आणि जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभरातील महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये असाच त्यांच्या उद्दाम वागण्याचा इशारा होता, हे त्या प्रसंगाच्या व्हिडिओमधून राज्यभरातील जनतेस कळून चुकले आहे. मुख्यमंत्र्यांदेखत असा उद्दामपणा करूनही त्यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या वागण्याचे समर्थन केले. संकटग्रस्तांबाबत सरकार संवेदनशून्य असल्याचेच दाखवून दिले आहे. भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीचे अनेक दाखले याआधीही महाराष्ट्रास मिळाले असतानाही मुख्यमंत्री सातत्याने त्यांची पाठराखण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आमदार जाधव यांचा उद्दामपणा मोकाट सुटला आहे, असा आरोपही आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केला आहे.