मुख्यमंत्री, राजपुत्राचा दौरा कन्फर्म! संभाव्य पॅकेजच्या घोषणेची महाउत्सुकता, पूर्वसंध्येला रंगतेय महाचर्चा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंच निवडणूक कार्यक्रम ठरण्याच्या धामधुमीत 2 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यात येण्याची चर्चा सुरू झाली. 3 फेब्रुवारीला ती कायम राहिली अन् आज, 4 फेब्रुवारीच्या संध्याकाळी त्यावर शिक्कामोर्तब झालंय! उद्या, 5 फेब्रुवारीला सकाळी मुख्यमंत्र्यांचे युवराज तथा मंत्रिमंडळातील सहकारी आदित्य ठाकरे यांच्यासह सरोवर नगरी लोणार येथे आगमन होणार आहे.आज, …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंच निवडणूक कार्यक्रम ठरण्याच्या धामधुमीत 2 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यात येण्याची चर्चा सुरू झाली. 3 फेब्रुवारीला ती कायम राहिली अन् आज, 4 फेब्रुवारीच्या संध्याकाळी त्यावर शिक्कामोर्तब झालंय! उद्या, 5 फेब्रुवारीला सकाळी मुख्यमंत्र्यांचे युवराज तथा मंत्रिमंडळातील सहकारी आदित्य ठाकरे यांच्यासह सरोवर नगरी लोणार येथे आगमन होणार आहे.
आज, 4 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या आगमनाची वर्दी आली! मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांचा दौरा कन्फर्म झाला खरा, पण त्याची तपशीलवार माहिती मात्र देण्यात आली नाही. आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत हा तपशील मिळण्याचे संकेत मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाने याला दुजोरा दिला. मात्र उद्या सकाळी 9.30 वाजता हे कर्तबगार पिता- पूत्र लोणार येथे डेरे दाखल होणार आहेत. यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडची महसूल, बांधकाम विभागाने कालच पाहणी केली. पोलीस विभागाचे अधिकारी, गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षिततेचा आढावा घेतला. बंदोबस्तचे नियोजन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पूर्वसंध्येला सीएमच्या घाईगडबडीत ठरलेल्या दौर्‍याची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विकासाबद्दलची आस्था, मंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यटन विकासाबद्दल असलेली तळमळ पाहता या भेटीत लोणार सरोवराच्या सर्वांगीण खात्रीशीर विकासासाठी पॅकेजची घोषणा या दौर्‍यात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केवळ सरोवर नगरवासीच नव्हे जिल्ह्यातील लाखो विकास प्रेमी नागरिक व या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन केंद्राच्या विकासासाठी आस लागून असलेले अभ्यासक व प्रेमी यांच्या नजरा उद्याच्या दौर्‍याकडे लागल्या आहेत.