मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद… आणखी 15 दिवस निर्बंध कायम राहणार, काही जिल्ह्यांत कडक, काही ठिकाणी शिथिलता आणणार!

मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र, महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढताना दिसतोय. कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार आहे. नाईलाजाने आपल्याला अजून 15 दिवस (15 जूनपर्यंत) निर्बंध काय ठेवावे लागणार आहेत. काही जिल्ह्यांत निर्बंध कडक होतील तर काही जिल्ह्यांत शिथीलता आणणार आहोत. यासाठी सर्व जिल्ह्यांचा …
 

मुंबई (मुंबई लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र, महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढताना दिसतोय. कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार आहे. नाईलाजाने आपल्याला अजून 15 दिवस (15 जूनपर्यंत) निर्बंध काय ठेवावे लागणार आहेत. काही जिल्ह्यांत निर्बंध कडक होतील तर काही जिल्ह्यांत शिथीलता आणणार आहोत. यासाठी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊनच निर्णय घेणार आहे. कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. हिवरेबाजार, घाटने या गावांची उदाहरणे देऊन आपण सर्वांनी कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.
साधारण एक महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेतला विषाणू झपाट्यानं पसरला. तिसरी लाट पूर्णतः आपल्या वागणुकीवर अवलंबून राहील. अवतार बदललेल्या विषाणूवर आपण अजूनही कंट्रोल मिळवलेला नाही. त्यामुळे आपल्याला पुढची पावलं फार सावधगिरीने उचलावी लागणार आहे. दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा मोठी होती. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले तर बरीच बालके अनाथ झाली. त्यांच्या आयुष्याची पुढील वाटचाल आम्ही पोरकी होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

निर्बंध लादणे चूक, पण…
मुख्यमंत्री ठाकरे म्‍हणाले, की महाराष्ट्रावर संकटांची मालिका सुरूच आहे. नुकताच कोकणात दौरा केला. केंद्राने मदतीचे निकष बदलायला पाहिजे. संकट जर वारंवार येणार असतील तर त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात लागणार आहे. पक्की निवारा, जमिनीतून वीज पुरवठा अशा उपाययोजा कराव्यात लागणार आहेत. निर्बंध लादणे वाईट आहे परंतु नाईलाजास्तव हे करावे लागले. नाईलाजाने हे कटू काम करावे लागले. आता कोरोनाची लाट कमी होत आहे. एक गोष्ट नक्की की सध्या परिस्थिती सुधारत आहे. कडक लॉकडाऊन केलेला नाही. रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या हलकीशी वाढत आहे. ग्रामीण भागांत हे प्रमाण वाढत आहे. तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता आहे. तिसरी लाट आपल्याला सांगून येणार नाही. आपल्याला वागणुकीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षीच्या व्हायरस आणि यंदाचा व्हायरस वेगळा आहे. झपाट्याने तो ग्रासून टाकतो. रुग्णांना बरे होण्यासाठी वेळ लागतो. ऑक्सिजनची आवश्यकता दीर्घ काळ लागत आहे.

प्रशासनाचे केले अभिनंदन
सध्या सहाशे प्रयोगशाळा सुरू केल्या आहे. ऑक्सिजन बेड्स सुरू केले आहेत. हे करत असताना एका गोष्टीची गरज जाणवली ती म्हणजे ऑक्सिजन. आपल्या राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता १३०० मेट्रिक टनाची आहे. प्रत्यक्षात १७०० मेट्रिक टनाची गरज लागली. उद्योगांचा ऑक्सिजन बंद करून आरोग्यासाठी वापरला. तोही कमी पडल्यानंतर बाहेर राज्यातून ऑक्सिजन आणला. ही परिस्थिती निभावल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन. हे सर्व तारेवरची कसरत होती. हे कमी होते म्हणून आता काळी फंगस आली आहे. ही साथ नाही. परंतु त्यावर उपचार सुरू आहे. तज्‍ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णामध्ये साखरेचा प्रमाण वाढले तर हा आजार होतो.

लसीकरण होणार, पण…
१८ ते ४४ वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सहा कोटी लोकांना १२ कोटी लसीची गरज आहे. आपली तयारी आहे. जसा पुरवठा होईल, तसे लसीकरण केले जाईल. आपली क्षमता आहे परंतु त्याला मर्यादा आहे. लस आणि उत्पादन क्षमता हवी तशी नाही. जून महिन्यांपासून पुरवठ्यात वाढ होईल, असे सांगितले आहे. प्रमाण वाढल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढेल. सव्वा दोन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. अजून १० कोटी लोक बाकी आहेत.

बारावीबाबत निर्णय लवकरच
शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. दहावीची परीक्षा न घेता मूल्याकनांवरून गुण दिले जाणार आहे. बारावीबाबत आपण निर्णय घेणार आहे. नीट, इतर परीक्षांसाठी केंद्राने धोरण ठरवायला पाहिजे. या बाबत पंतप्रधानांना पत्र लिहून धोरण ठरवण्याबाबत सूचना करणार आहे. याबाबत केंद्राने मार्गदर्शन केले पाहिजे. ऑफिसच्या बाबतीत वर्क फ्रॉम होम प्रमाणे शिक्षणाचेही तसेच करता येईल का याची चाचपणी करत आहोत. शिक्षण चालू राहिले पाहिजे. त्यासाठी काही क्रांतीकारक निर्णय घेण्याची गरज आहे. ऑनलाइन काही करता येईल का हे बघत आहोत. गेल्या महिन्यात मी उद्योगपतींची बैठक घेतली होती. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबू नये, यासाठी उपाय केले. शिक्षण क्षेत्रातही असेच काही करावे लागणार आहे.

शेतीविषयक कामांत बंधने नाहीत…
पावसाळा तोंडावर आहे. कृषी हंगाम सुरू होत आहे. गेल्या वर्षी कृषी क्षेत्राला आपण हातभर लावला. बी-बियाणे, खरे यांची दुकाने कामे बंद ठेवली नाही. या ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. अन्नदात्याचे आरोग्य बिघडू नये. आपल्याला सरकार संपूर्ण सहकार्य करेल. कृषीविषयक कामात कोणतेही बंधन लादले जाणार नाही. दुसरी लाट अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. अनेकांना आपले आप्तस्वकीय गमावले आहे. यामध्ये काही बालके अनाथ झाली आहे. काही पालक गेली आहे. जी बालकं अनाथ झाली आहेत, त्यांना राज्य सरकार त्यांचे पालकत्व घेईल. अनाथ बालकांना त्यांना शासन साथ देईल. योजना तयार केली जात आहे.

आंदोलन करू नका…
दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणत आहोत. नाइलाजास्तवर काही निर्बंध १५ दिवस वाढवत आहोत. काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील काही ठिकाणी सूट दिली जाईल. काही जण आंदोलनाचा इशारा देत आहे, त्यांनी असे करू नये. हे संकट विचित्र आहे. हे संकट कमी झाले म्हणून रस्त्यावर उतरू नये, कोरोना दूत म्हणून रस्त्यावर उतरा. कोरोनाचा साथ ही सरकारची योजना नाही. रस्त्यावर उतरणे म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे प्रमाण पाहून हा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन प्लांट लावण्यास सुरुवात झाली आहे. यापुढे आपले सहकार्य कायम ठेवा. आपल्या मित्रपरिवारासाठी नियम पाळा. बदललेल्या विषाणूचा अवतार पाहून, तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसू नये, यासाठी करोनामुक्त गाव योजना यशस्वी केल्यास तिसऱ्या लाटेवर मात करू शकतो. दोन लाटेचा आपल्याला अनुभव आहे. सर्वांना जिद्दीने ठरवल्यास तिसरी लाट येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्‍हणाले.