मुख्याधिकाऱ्यांच्या नोटिसीला केराची टोपली दाखवणाऱ्या बन्सीले बापलेकाविरुद्ध गुन्‍हा दाखल; देऊळगाव शहरातील घटना, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांत खळबळ!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनधिकृत बांधकाम थांबविण्याची सूचना करूनही बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या बन्सील बापलेकांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत पत्र दिले होते. या धडक कारवाईने शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. अनंता रतनलाल बन्सीले (६४) व मयूर अनंता बन्सीले (२९, …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनधिकृत बांधकाम थांबविण्याची सूचना करूनही बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या बन्सील बापलेकांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत पत्र दिले होते. या धडक कारवाईने शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

अनंता रतनलाल बन्सीले (६४) व मयूर अनंता बन्सीले (२९, दोघे रा. जुना जालना रोड, देऊळगाव राजा) अशी आरोपींची नावे आहेत. ते अनधिकृत बांधकाम करत असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने नगरपरिषदेकडे केली होती. त्‍यावर मुख्याधिकाऱ्यांन बन्सीले यांना बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. मात्र बन्सीले बापलेकांनी याची दखल घेतली नाही. सामाजिक कार्यकर्त्याने पुन्‍हा ही बाब मुख्याधिकाऱ्यांना कळवली. त्‍यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी खात्री केली असता बांधकाम सुरूच असल्याचे दिसून आले. त्‍यांनी गुन्‍हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले. त्‍यामुळे गुन्‍हे दाखल झाले आहेत.