मुलगी पळवून नेणाऱ्या युवकाचा खून; खामगाव तालुक्‍यातील थरारक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाचा मुलीच्या नातेवाइकांनी खून केला. 29 मार्चच्या रात्री त्याला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली होती. काल, 30 मार्चला सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. ही थरारक घटना नागापूर (ता. खामगाव) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सूत्रांनी सांगितले, की संजय रघुनाथ बुंदे (24, रा. नागापूर) …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाचा मुलीच्‍या नातेवाइकांनी खून केला. 29 मार्चच्‍या रात्री त्‍याला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली होती. काल, 30 मार्चला सायंकाळी त्‍याचा मृत्‍यू झाला. ही थरारक घटना नागापूर (ता. खामगाव) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सूत्रांनी सांगितले, की संजय रघुनाथ बुंदे (24, रा. नागापूर) या युवकाने गावातीलच अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी पळवून नेले होते. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला 45 दिवस बुलडाणा येथे तुरुंगातही जावे लागले होते. नंतर त्याची  जामिनावर सुटका झाली होती. 29 मार्च रोजी रमेश इंगळे, गणेश शाळीग्राम इंगळे व सतिश इंगळे यांनी तू आमच्या मुलीला पळवून नेऊन आमची बदनामी केली, असे म्हणत संजय बुंदे यास लोखंडी पाईपने जबर मारहाण करायला सुरुवात केली. त्‍याला वाचविण्यासाठी धावलेल्या संजयचे वडील रघुनाथ यांनासुद्धा मारहाण केल्याने तेही जखमी झाले होते. संजय यांचा भाऊ सुनील बुंदे याने खामगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय बुंदेला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले होते. मात्र त्याची तब्येत अधिकच खालावल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात येत होते. मात्र काल सायंकाळी नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपी रमेश शाळीग्राम इंगळे(48), सतिश रमेश इंगळे(19) या पिता- पुत्रांना पोलिसांनी काल रात्रीच अटक केली होती. आज गणेश शाळीग्राम इंगळे (40, तिघेही रा. नागापूर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.