मुलाच्या विरहात जिल्हा परिषद शिक्षिकेची आत्महत्या; मोताळा तालुक्यातील हृदयद्रायक घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही महिन्यांपूर्वीच एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केली. त्या दुःखातून सावरू न शकल्याने मुलाच्या विरहात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या आईने देखील आत्महत्या करून जीवनयात्रा संपविण्याची हृदयद्रावक घटना गुळभेली (ता. मोताळा) येथे 18 जुलै रोजी सायंकाळी समोर आली. मंगला लक्ष्मण धायडे (40, रा. धाड नाका बुलडाणा) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.मंगला …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही महिन्यांपूर्वीच एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केली. त्या दुःखातून सावरू न शकल्याने मुलाच्या विरहात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या आईने देखील आत्महत्या करून जीवनयात्रा संपविण्याची हृदयद्रावक घटना गुळभेली (ता. मोताळा) येथे 18 जुलै रोजी सायंकाळी समोर आली. मंगला लक्ष्मण धायडे (40, रा. धाड नाका बुलडाणा) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
मंगला धायडे चिखला (ता. बुलडाणा) येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका होत्या.सर्व काही सुरळीत असताना काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलाच्या अकाली निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुःखातून त्या सावरू शकल्या नाहीत. 17 जुलै रोजी मंगला धायडे माहेरी गुळभेली येथे गेल्या होत्या. तेथेच 18 जुलैला सायंकाळी बाथरूमच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. धामणगाव बढे पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.