मुला-मुलीसह सुनगावची विवाहिता बेपत्ता; दोन तरुणीही जिल्ह्यातून गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात निर्बंध असले तरी व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोज कुणी ना कुणी घर सोडून जाते. बुलडाणा लाइव्ह वारंवार याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध करते. पण तरीही पालकांकडून खबरदारी घेण्याचे प्रमाण शून्यच असल्याचे दिसून येते. अतिविश्वासच त्यांना नडत असल्याचे अशा घटनांतून समोर येते. आज, 26 मे रोजी जिल्ह्यातून 18 व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात निर्बंध असले तरी व्‍यक्‍ती बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोज कुणी ना कुणी घर सोडून जाते. बुलडाणा लाइव्‍ह वारंवार याबद्दलच्‍या बातम्‍या प्रसिद्ध करते. पण तरीही पालकांकडून खबरदारी घेण्याचे प्रमाण शून्यच असल्याचे दिसून येते. अतिविश्वासच त्‍यांना नडत असल्याचे अशा घटनांतून समोर येते. आज, 26 मे रोजी जिल्ह्यातून 18 व 20 वर्षीय दोन तरुणी बेपत्ता झाल्‍याचे समोर आले आहे. याशिवाय सुनगाव येथून 37 वर्षीय विवाहिता आपल्या 15 वर्षीय मुलगी व 8 वर्षीय मुलासह घरातून निघून गेली आहे.

सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील सौ. गिता गजानन वंडाळे (37) या मुलगी कोमल (15) आणि मुलगा शुभम (8) यांना सोबत घेऊन गेल्या आहेत. त्‍यांच्‍या हरवल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. लोणार तालुक्‍यातील अंजनी खुर्द येथील पल्लवी विनोद अवसरमोल (18) व शेगाव तालुक्‍यातील टाकळी विरो येथील अश्विनी कैलास इंगळे (20) या दोघी घरातून निघून गेल्या आहेत. त्‍या हरवल्याची तक्रार अनुक्रमे मेहकर आणि जलंब पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.