मुसळधार पावसाने शेतजमिनी खरडल्‍या, आमदार श्वेताताई महाले बांधावर!; अधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्‍याचे आदेश

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुसळधार व संततधार पावसामुळे उंद्री, अमडापूर, किन्हीसवडत, तोरणवाडा, माळशेंबा, कव्हळा तसेच तालुक्यातील इतर गाव परिसरात शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या. मशागत केलेल्या जमिनी आणि काही प्रमाणात झालेली पेरणी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरडून गेलेल्या जमिनीचे आणि पेरणी वाया गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळण्यासाठी तालुक्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुसळधार व संततधार पावसामुळे उंद्री, अमडापूर, किन्हीसवडत, तोरणवाडा, माळशेंबा, कव्हळा तसेच तालुक्यातील इतर गाव परिसरात शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या. मशागत केलेल्या जमिनी आणि काही प्रमाणात झालेली पेरणी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरडून गेलेल्या जमिनीचे आणि पेरणी वाया गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळण्यासाठी तालुक्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करा, असे आदेश आमदार सौ. श्वेताताई महाले पाटी यांनी नुकसानीची पाहणी करताना तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी उंद्री, वैरागड, किन्ही सवडत, हरणी, डासाळा, अमडापूर परिसरातील अन्य गावांत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे , तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी मंडळ अधिकारी महादेव शेळके उपस्‍थित होते.

मदतीसाठी पाठपुरावा करू -आमदार सौ. श्वेताताई महाले
तीन तासांत तब्बल 104 मि.मी.पाऊस पडल्याने नदी व नाल्या दुथडी भरून वाहिल्या. नदी व नाल्याकाठच्या संपूर्ण शेतजमिनी खरडून गेल्या. उन्हाळी पेरणी वाहून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याने त्यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे असल्याने शासनाकडे तातडीने मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी यावेळी सांगितले .

मडापूर येथील पाझर तलाव फुटून नुकसान
अमडापूर गट क्र. 354 व 356 येथील कृषी विभागाचा पाझर तलाव होता. त्या तलावाला सपाट करण्याचा प्रयत्न झाल्याने फुटून झाले. मधुकर मोतीराम सोनुने यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे सोनुने यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. फुटलेला तलाव व झालेल्‍या नुकसानीची सुद्धा पाहणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी गजानन रसाळ, सुभाष बिबे, मुकेश भंडारे, गणेश चंदनकर, मधुकर सोनुने, बबन सोनुने यांच्यासह गजानन देशमुख, योगेश जुबंडे, गजानन जाधव, प्रशांत पाखरे, अरूण जाधव, गाजी बाबा, प्रविणशेठ खंडेवाल, दीपक झाडे, रामकृष्ण राठी, राजू राठी, भीमराव अंभोरे, अशोक हातागळे, महादेव ठाकरे, गणेश क्षीरसागर, विद्यासागर क्षीरसागर, मनोरमा क्षीरसागर, गजानन सवडतकर, देविदास सवडतकर, भागवत सवडतकर, उमेश सवडतकर, भुजंग नारायण, दामोदर क्षीरसागर, मोतीराम धुरंधर, दयासागर बराटे, अरुण सवडतकर, संजय धुरंधर, विजय बराटे आदी शेतकरी उपस्थित होते.