मूळचा बुलडाण्याचा तहसीलदार लोखंडे अकोल्यात लाचेच्‍या जाळ्यात अडकला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अकोल्याचा तहसीलदार आणि मूळचा बुलडाण्यातील रहिवासी असलेला विजय सुखदेव लोखंडे याला भ्रष्टाचार प्रकरणी अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, 16 एप्रिलला सायंकाळी अटक केली. लोखंडे बुलडाणा शहरातील केशवनगरचा रहिवासी आहे.स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाचेची मागणी करणाऱ्या पुरवठा निरीक्षक नीलेश भास्कर कळस्कर याला 7 एप्रिल रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अकोल्याचा तहसीलदार आणि मूळचा बुलडाण्यातील रहिवासी असलेला विजय सुखदेव लोखंडे याला भ्रष्टाचार प्रकरणी अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, 16 एप्रिलला सायंकाळी अटक केली. लोखंडे बुलडाणा शहरातील केशवनगरचा रहिवासी आहे.
स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाचेची मागणी करणाऱ्या पुरवठा निरीक्षक नीलेश भास्कर कळस्कर याला 7 एप्रिल रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना तहसीलदार विजय लोखंडे यानेही गैरव्यवहार केल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. कोरोना काळात शासनाने गोरगरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप शासकीय स्वस्त धान्य दुकानातून केले होते. त्या वाटपाच्या रकमेचा चेक काढून देण्याच्‍या मोबदल्यात 10 टक्के लाचेची मागणी पुरवठा निरीक्षक कळस्कर याने केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या सापळ्याची कुणकुण लागताच कळस्करने लाच घेण्याचे टाळले होते. मात्र लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात तपासादरम्यान घेण्यात आलेल्या जबाबावरून, प्राप्त व एसीबीने जप्त केलेल्या दत्तऐवजावरून अकोल्याच्या तहसीलदार विजय लोखंडे यानेही पदाचा दुरुपयोग करून गैरफायदा मिळविण्याच्या अपेक्षेने अप्रामाणिकपणा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोखंडे याला काल सायंकाळी अटक केली.