मृत्यूची मालिका कायम! 7 जणांनी गमावला जीव!! बळींची संख्या 616 वर, आज पावणेदोनशे पॉझिटिव्ह

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना जिल्ह्यातील मृत्यूचे थैमान मात्र कायम असल्याचे परस्परविरोधी चित्र आहे. आज, 2 जून रोजी जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 7 रुग्णांनी प्राण गमावल्याचे समोर आले. यामुळे एकूण बळींची संख्या 616 पर्यंत पोहोचली आहे. मृत्यूची मालिका कायम असणे प्रशासन व आरोग्य यंत्रणांची मोठी …
 
मृत्यूची मालिका कायम! 7 जणांनी गमावला जीव!! बळींची संख्या 616 वर, आज पावणेदोनशे पॉझिटिव्ह

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना जिल्ह्यातील मृत्यूचे थैमान मात्र कायम असल्याचे परस्परविरोधी चित्र आहे. आज, 2 जून रोजी जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 7 रुग्णांनी प्राण गमावल्‍याचे समोर आले. यामुळे एकूण बळींची संख्या 616 पर्यंत पोहोचली आहे. मृत्यूची मालिका कायम असणे प्रशासन व आरोग्य यंत्रणांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. आज 175 नवे रुग्‍ण आढळले. यातही 7 तालुकेच दुहेरी आकड्यात आहेत. यामध्ये बुलडाणा 32, चिखली 24, मेहकर 25, मलकापूर, खामगाव सिंदखेडराजा प्रत्येकी 15, शेगाव 16 या तालुक्यांचा समावेश आहे. नांदुरा 4, लोणार 5, मोताळा 3, जळगाव व संग्रामपूर प्रत्येकी 6 अशी इतर तालुक्यातील रुग्णसंख्या आहे.

हे ठरले बळी…
उपचारादरम्यान जिगाव (ता. नांदुरा) येथील 79 वर्षीय पुरुष, मेंढळी (ता. नांदुरा) येथील 40 वर्षीय पुरुष, मनार्डी (ता. संग्रामपूर) येथील 85 वर्षीय महिला, खामखेड (ता. मोताळा) येथील 75 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला, दहिद (ता. बुलडाणा) येथील 62 वर्षीय महिला, विदर्भ हौसिंग सोसायटी बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

3759 कोरोना अहवाल निगेटिव्ह
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3934 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3759 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 175 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 98 व रॅपीड टेस्टमधील 77 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 672 तर रॅपिड टेस्टमधील 3087 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : साखळी 2, जामठी 2, चांडोळ 2, पिंपळगाव सराई 2, केसापूर 1, म्हसला 1, करडी 1, गुम्मी 1, पोखरी 1, सावळी 1, मासरुळ 1, मोताळा तालुका : बोराखेडी 1, शिरवा 1, गुगळी 1, कोथळी 1, खडकी 2, दाभाडी 1, पोफळी 1, वरूड 1, खामगाव शहर : 10, खामगाव तालुका : हिवरा 1, शेगाव शहर : 4, शेगाव तालुका : चिंचोली 1, जानोरी 1, टाकळेश्वर 1, पाजवा 1, चिखली शहर : 6, चिखली तालुका : खैरव 4, सावरखेड 1, शेळगाव आटोळ 2, दहिगाव 1,इरला 1, हातनी 1, अन्वी 1, शेलगाव जहागीर 3, गागलगाव 2, भानखेड 1, मलकापूर शहर :10, मलकापूर तालुका : उमाळी 1, निमखेड 2, देऊळगाव राजा शहर : 3 , देऊळगाव राजा तालुका : जुमडा 1, टाकरखेड भागीले 3, बायगाव 1, संग्रामपूर तालुका : काटेल 1, सोनाळा 2, निरोड 1, पळशी 1, वडगाव वान 1, काकणवाडा 1, सिंदखेड राजा शहर :5, सिंदखेड राजा तालुका : सुलजगाव 1, मोहाडी 1, ताडशिवनी 4, विझोरा 1, भंडारी 1, शिंदी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : जानेफळ 2, बाऱ्हाई 1, डोणगाव 3, नायगाव 1, वर्दाडी 3, मिस्किनवाडी 1, भोसा 3, कल्याणा 1, घाटबोरी 2, आरेगाव 1, मादनी 1, बदनापूर 1, देऊळगाव माळी 2, पेनटाकळी 2,लोणी 1, अंजनी 1, दुर्गबोरी 2, लोणी लव्हाळा 2, जळगाव जामोद शहर : 4, जळगाव तालुका : तरोडा 1, सुनगाव 1, धानोरा 2, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : नायगाव 1, पिंपळखुटा धांडे 1, महाळुंगी 1, वाडी 1, लोणार शहर :1, लोणार तालुका : दाभा 1, पिंपळनेर 1, वझर सरकटे 1, बिबी 1, धायफळ 1,जांभूळ 1, परडा 1, कोनाटी 1, परजिल्हा अकोट 1, तेल्हारा 1, बाळापूर 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 175 रुग्ण आढळले आहेत.

1469 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार
आज 333 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 488718 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 82996 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 787 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85081 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या 1469 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 616 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.