मॅरेज ब्‍युरोतून आलेल्या स्‍थळाने “तिचा’ मांडला छळ! पोटजाती वेगळ्या असूनही दोघांची मनं जुळल्याने केले होते लग्‍न!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाह सूचक मंडळाव्दारे त्याने संपर्क केला… दोघांच्या पोटजाती वेगळ्या, तरीही मनं जुळल्याने दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या घरच्यांना ही बाब खटकलेली होती, ती तशीच राहिली… मग सुरू झाला तिचा छळ… प्रेमासाठी तिनं सारं सारं सहन केलं… पण जेव्हा तो उलटला अन् घरच्यांना साथ देऊ लागला… तेव्हा मात्र ती थक्क …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विवाह सूचक मंडळाव्दारे त्‍याने संपर्क केला… दोघांच्‍या पोटजाती वेगळ्या, तरीही मनं जुळल्‍याने दोघांनी लग्‍नाचा निर्णय घेतला. मात्र त्‍याच्या घरच्‍यांना ही बाब खटकलेली होती, ती तशीच राहिली… मग सुरू झाला तिचा छळ… प्रेमासाठी तिनं सारं सारं सहन केलं… पण जेव्हा तो उलटला अन्‌ घरच्यांना साथ देऊ लागला… तेव्हा मात्र ती थक्‍क झाली… त्‍याने तिला माहेरी आणून सोडले… विनंत्या करूनही तो सोबत नेत नसल्याने अखेर तिने बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, पोलिसांनी तिच्‍या तक्रारीवरून पती, सासू-सासरे, जेठ-जेठाणी, नणंद, नंदोई यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौ. सोनल पंकज तायडे (३०, ह. मु. व्दारा प्रमिला प्रकाश गवई रा. सोमनाथनगर चिखली रोड सुंदरखेड, बुलडाणा) असे तक्रारदार विवाहितेचे नाव असून, पंकज आनंद तायडे (३५), सौ. मनोरमा आनंदा तायडे (५७), आनंद तायडे (६८), अविनाश आनंदा तायडे (३७), सौ. श्रध्दा अविनाश तायडे (२६, रा. यशोदरानगर खामगाव), अनुपमा कमलेश पवार (३२), कमलेश पवार (३९,रा. मुंबई) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारीत विवाहितेने म्‍हटले आहे, की तिचे लग्‍न बुलडाणा येथे गेल्या वर्षी ७ मे रोजी झाले होते. पंकजचे स्थळ विवाह सूचक मंडळाव्दारे आले होते. सासरच्यांनी पंकजसाठी दुसरी मुलगीसुध्दा पाहिली होती. मात्र जुळल्यामुळे पंकजने त्याच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सोनलसोबत लग्न केले. त्यामुळे इतर मंडळींचा सोनलला विरोध होता. लग्नानंतर सासरच्यांनी मोलकरणीप्रमाणे घरातील संपूर्ण कामे करायला लावणे, पोटभर जेवायला न देणे असा त्रास देणे सुरू केले. एके दिवशी नास्ता बनवत असताना सासूने तोंडावर गरम तेल फेकले होते; परंतु तोंड बाजूला केल्यामुळे तेल तोंडावर न उडता काही थेंब तोंडावर उडाल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

माहेरी येण्यासाठी पतीसह मी बुलडाणा येथे आले असता मला केवळ एकच दिवस माहेरी ठेवले व लगेच खामगाव येथे परत घेऊन गेला. त्यानंतरही माझा छळ सुरूच राहिला. ही बाब पतीला सांगितली असता त्याने त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. आपल्याला येथे पाहुण्यासारखे रहायचे आहे. नंतर पुण्याला राहण्यासाठी जायचे आहे, असे सांगितले. पती २१ जूनला पुणे येथे नोकरीनिमित्त निघून गेला. त्यानंतर मात्र पतीनेही माझा छळ करणे सुरू केले, असे सोनलने म्‍हटले आहे. २६ जुलै २०२० रोजी पती खामगांव येथे परत आल्यावर त्याच्या स्वभावात कमालीचा बदल घडून आला. त्याने मला १२ आॅगस्ट २०२० रोजी माहेरी आणून सोडले. माझी आई व इतर नातेवाइकांनी मला परत पाठविण्यासाठी प्रयत्न केला मात्र सासरहून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही गेलो असता अपमानित करून काढून दिले, असेही तक्रारीत म्‍हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.