मेरे को कालुभाई बोलते है, मैं वडनेर का रहनेवाला हूँ…; शेतकऱ्याला बांधून टाकून वाहनात चोरून नेली ९ जनावरे!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्याला बांधून ९ जनावरे वाहनात घालून चोरून नेल्याची खळबळजनक घटना नांदुरा तालुक्यातील वाडी येथे समोर आली आहे. या प्रकरणी ज्ञानदेव सुखदेव गिऱ्हे (५७, रा. वाडी) यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ जुलैच्या रात्री वाडी शिवारातील गट क्रमांक २४२ मधील शेतातील टिनशेडमध्ये …
 
मेरे को कालुभाई बोलते है, मैं वडनेर का रहनेवाला हूँ…; शेतकऱ्याला बांधून टाकून वाहनात चोरून नेली ९ जनावरे!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्याला बांधून ९ जनावरे वाहनात घालून चोरून नेल्याची खळबळजनक घटना नांदुरा तालुक्‍यातील वाडी येथे समोर आली आहे. या प्रकरणी ज्ञानदेव सुखदेव गिऱ्हे (५७, रा. वाडी) यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

२५ जुलैच्‍या रात्री वाडी शिवारातील गट क्रमांक २४२ मधील शेतातील टिनशेडमध्ये गिऱ्हे थांबलेले होते. साडेअकराच्‍या सुमारास टिनशेडजवळ पांढरी चारचाकी येऊन थांबली. त्यातील तीन लोक उतरून गिऱ्हे यांच्‍याकडे आले. त्‍यांनी त्‍यांना दोरीने बांधून टाकले. त्‍यानंतर जनावरे बांधलेल्या दोऱ्या कापून ६ बकऱ्या, दोन पिल्लं व १ बोकड अशी नऊ जनावरे (किंमत अंदाजे ६० हजार रुपये) घेऊन पोबारा केला. जाता जाता त्यातील एक बोलला की, मेरे को कालुभाई बोलते है, मै वडनेर का रहनेवाला हूँ… काल सकाळी गाडीच्या चाकांचे निशाण हे पिंपळगाव आढावकडे गेल्याचे दिसून आले. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. उमाळे करत आहेत.