मेहकरमध्ये आगीचे तांडव, मिठाई दुकान खाक; दोन गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने टळला अनर्थ

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगर परिषद समोरील हादिमिया कॉम्प्लेक्समधील बालाजी स्वीट मार्टला शॉर्ट सर्किटमुळे 18 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणार्या करिश्मा ड्रेसेसचे मालक तारीक खान यांच्या निदर्शनास आग आल्याने त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत बालाजी स्वीट मार्टचे शटर तोडून दुकानातील भरलेले दोन गॅस सिलिंडर तत्काळ …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगर परिषद समोरील हादिमिया कॉम्प्लेक्समधील बालाजी स्वीट मार्टला शॉर्ट सर्किटमुळे 18 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या करिश्मा ड्रेसेसचे मालक तारीक खान यांच्या निदर्शनास आग आल्याने त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत बालाजी स्वीट मार्टचे शटर तोडून दुकानातील भरलेले दोन गॅस सिलिंडर तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने हादिमिया कॉम्प्लेक्समध्ये राहणार्‍या कुटूंबियांनी सुटकेचा श्‍वास घेतला.

आग मोठी असल्याने तारीक खान यांनी घरच्या पाण्याने आग विझवण्यासाठी केलेला प्रयत्न तोकडा पडल्याने त्यांनी मेहकर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला दुरध्वनीद्वारे माहिती दिली. तोपर्यंत घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. आग विझवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस रात्री अडीच वाजताच्या सुमारास आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाले होते. आग विझवण्यासाठी तारिक खान, काँग्रेसचे गटनेते आलिम ताहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आफताब खान, सुमेर खान, तौसिफ खान, पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक श्री. जायभाये, पोलीस उपनिरीक्षक श्री. घुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम निळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोढे, रामेश्‍वर रिंढे, आरोग्य निरीक्षक विशाल शिरपूरकर, इलेक्ट्रिशियन नारायण इंगळे, गजानन कुलाळ, नसीर खान, तेजू सिंग, गब्बर सिंग अग्रवाल पेट्रोल पंपाचे कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.