मेहकरमध्ये व्यावसायिकांना कोरोना चाचणी अनिवार्य!; तहसीलदारांची माहिती

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी कोरोनाची तिसरी लाट बघता प्राथमिक उपाययोजना म्हणून शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यावसायिकांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संजय गरकळ यांनी केले आहे. मेहकर …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी कोरोनाची तिसरी लाट बघता प्राथमिक उपाययोजना म्हणून शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यावसायिकांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संजय गरकळ यांनी केले आहे.

मेहकर येथील नगर परिषद सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पंचायत समिति गटविकास अधिकारी आशिष पवार, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाडे, जानेफळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई, कळमेश्वरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. होने आदी अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत शहरातील किराणा, कापड, मेडिकल तसेच लघु व्यवसायिक संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना बाबत भविष्यात करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी तहसीलदार गरकळ यांनी मेहकर शहरातील सर्व व्यावसायिकासाठी १२ जुलै ते २७ जुलै दरम्‍यान कोरोना तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती दिली. बैठकीस तालुक्यातील मंडळ अधिकारी उपस्थित होते.