मेहकरमध्ये शिवसेनेतर्फे कोविड केअर सेंटर सुरू

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेना व युवा सेनेतर्फे मेहकरमध्ये आज, 2 मे रोजी श्रीमती सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही आपापल्या विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले आहे. 100 बेडच्या सर्व सुविधांयुक्त या कोविड सेंटरचे खा. जाधव यांनी …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिवसेना व युवा सेनेतर्फे मेहकरमध्ये आज, 2 मे रोजी श्रीमती सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही आपापल्या विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले आहे.

100 बेडच्या सर्व सुविधांयुक्त या कोविड सेंटरचे खा. जाधव यांनी उद्‌घाटन केले.  या सेंटरमध्ये रुग्णांना सर्व सुविधा मिळणार आहे. वायफाय आहे. योगा शिकवला जाणार आहे. जेवणाची व काढ्याची सोय केली जाणार आहे. आमदार संजय रायमूलकर म्हणाले, की मेहकर, लोणार, हिवरा आश्रम येथे कोविड केअर सेंटरला १००-१०० गाद्या आपण दिल्या. रुग्णांना ड्रायफ्रूट, नाष्टा चांगल्या दर्जाचा दिला जाईल. सर्व कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांची गैरसोय होणार नाही, असा शब्‍द त्‍यांनी दिला.

यावेळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, बळीराम मापारी, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर, सभापती माधवराव जाधव, गटनेते संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, रा.काँ.चे जिल्हा पदाधिकारी गिरीधर पाटील, शारंगधर अर्बन बँकेचे संचालक निरज रायमूलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार डॉ. संजय गरकळ, वैद्यकीय अधीक्षक श्याम ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरपाते, न.प.मुख्याधिकारी सचिन गाडे, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, उपसभापती बबनराव तुपे, दुर्गाप्रसाद रहाटे, डॉ. सचिन जाधव, नगरसेवक रवी रहाटे, नितीन गारोळे, भास्करराव राऊत यांच्‍यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी लाहोरकर, प्राचार्य गजानन निकस व कर्मचारी हजर होते. सूत्रसंचालन उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया यांनी केले. आभार नगरसेवक विकास जोशी यांनी मानले.