मेहकरमध्ये संशयास्पद फिरत होते… निघाले मोबाइल चोर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकरमध्ये संशयास्पदरित्या फिरणार्या दोघांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघे मोबाइल चोर असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई 27 जानेवारीला सायंकाळी करण्यात आली.अस्लम खा इमायत खा (24, रा. माळीपेठ, मेहकर) आणि अमीर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकरमध्ये संशयास्पदरित्या फिरणार्‍या दोघांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघे मोबाइल चोर असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई 27 जानेवारीला सायंकाळी करण्यात आली.
अस्लम खा इमायत खा (24, रा. माळीपेठ, मेहकर) आणि अमीर खान इब्राहिम खान (23, रा. घरकुल कॉलनी, मेहकर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे एक व्हिवो व एक मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत 15000 रुपये) मिळून आले. चौकशीत दोन्ही मोबाईल 27 मे रोजी मेहकर शहरातील रामनगर येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना मेहकर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, नीलेश शेळके, पोलीस अंमलदार भारत जंगले, नदीम शेख, विजय सोनोने, गजानन गोरले, वैभव मगर, सरिता वाकोडे, रवी बोर्डे व सायबर पोलीस स्टेशन बुलडाणाचे राजू आढवे, कैलास ठोंबरे यांनी पार पाडली.